आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजादी का अमृत महोत्सव:महसूल आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणाकडे जाणारा रस्ता खड्डेमय

नाशिकरोड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आजादी का अमृत महोत्सव’ नाशिक विभागात जल्लोषात साजरा व्हावा यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने नियोजन केले आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ हा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात होणार असून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात रंगरंगोटी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे मात्र कार्यालयात येणारा रस्ता हा संपूर्ण खड्डेमय झाल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.

भारतीय स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक उपायुक्त रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत केंद्र सरकारने “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी, असा आदेश यावेळी देण्यात आले. सामाजिक वनीकरण विभाग प्रवेशद्वारावर ‘स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन चिरायु होवो’, ‘आत्मनिर्भर भारत’, ‘हर घर तिरंगा’ आजादी का अमृत महोत्सव अशा आशयाचे जाहिरात फलक लावण्यात येणार आहेत.

एकीकडे ही तयारी सुरू असताना स्वातंत्र्य दिन साेहळ्यास येथे येण्यासाठीचा रस्ता खड्डेमय असल्याने हा रस्ता दुरुस्तीची मागणी हाेत आहे. बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त सिद्धेशर धुमाळ, तहसीलदार अनिल दौंडे, तहसीलदार जयश्री अहिरराव, आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...