आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे जनतेच्या कररूपी पैशाची टक्केवारीसाठी निकृष्ट कामे करून कशा प्रकारे उधळपट्टी केली जाते हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सचित्र जाहीर केले. सातपूर आैद्याेगिक वसाहतीत सकाळी तयार करण्यात आलेला रस्ता सायंकाळी उखडल्याचे मनसेचे महानगर संघटक विजय आहीरे यांनी उघडकीस आणून ठेकेदार व अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण सबंधांचा एकप्रकारे पुरावाच दिला.
मनसेच्या रस्ते व आस्थापना विभागाचे पदाधिकारी अतुल पाटील व विजय आहीरे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून निकृष्ट कामांचा पदार्फाश करण्याची माेहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सातपूर आैद्याेगिक वसाहतीत निवेक क्लब ते पाइपलाइनराेड या रस्त्याची त्यांनी पाहणी केली. या रस्त्याचे काम करताना कर्मचाऱ्यांनी काेणत्याही प्रकारचे नियाेजन केले नाही. रस्ता तयार करताना चक्क मातीवरच डांबरीकरण करण्यात आले. परिणामी संपूर्ण रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार झाला आहे.
सकाळी तयार केलेला रस्ता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी हाताने उखडून दाखवला. लाखाे रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाकडे टक्केवारी मिळत असल्याने सबंधित अधिकारी फिरकूनही बघत नसल्याचा आराेप पदाधिकाऱ्यांनी केला. सातपूरच्या बांधकाम विभागाचे अधिकारी कायम ठेकेदाराच्या गाड्यांमध्येच फिरताना दिसतात. त्यामुळे अधिकाऱ्यांसह सबंधित ठेकेदारावर फाैजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करून त्यांची चाैकशी करावी, अशी मागणी आहीरे यांनी केली.
तयार केलेल्या रस्त्यांवर काही दिवसात खड्डे
सध्या पालिका प्रशासनाकडून ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, डांबरीकरणाचा लेयर कमी असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे जशाच्या तसेच आहेत. त्यामुळे तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांवर काही दिवसांतच खड्डे दिसतात.- सतीश खैरनार, कामगार प्रतिनिधी
भ्रष्ट अधिकारी यातून बाेध कधी घेणार
आम्ही शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करून संबंधितांचे पीतळ यापुर्वीच उघडे पाडले हाेते. सातपूर विभागात असलेला अधिकारी फक्त टक्केवारीसाठीच येताे. नागरिकांना मात्र कधीच भेटत नाही. अजगराची कातडी पांघरून बसलेले असे भ्रष्ट अधिकारी यातून कधी बाेध घेणार?- विजय आहीरे, मनसे पदाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.