आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय योजना महामेळावा:शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणेची भूमिका महत्वाची - जगमलानी

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासन यंत्रणांनी प्रयत्नपूर्वक केलेला कामांमुळेच सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांची भूमिका महत्त्वाची असून सकारात्मर भुमिकेतून सर्व योजना जनतेपर्यंत पोहचाव्या, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, धर्मदाय सहआयुक्त टी. ए. अकाली, उपजिल्हाधिकारी नितीन मुंढावरे, वासंती माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह विधी क्षेत्रातील विधी अधिकारी व इतर यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

लोक अदालत, मध्यस्थी करून तसेच समुपदेशकांच्या माध्यमातून लोकांना जलदगतीने न्याय देण्याचे काम करण्यात येते. विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मोफत विधी सेवा कल्याणकारी योजना व कायद्यांची माहिती देणे, त्यांची जनजागृती करण्यासाठी अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. विभागीय आयुक्त गमे यांनी मनोगत व्यक्त केले, विविध योजना, नवनवीन संकल्पना यांची चर्चा होते आणि त्यातून सर्व शासकीय यंत्रणामध्ये समन्वय साधला जात असतो. नागरिकांना सर्व योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर मिळण्यासाठी मदत होते. जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी शासकीय योजनांची माहिती दिली.

या योजनांची मिळाली महिती

जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने किसान क्रेडीट कार्ड, मुद्रा कर्ज योजना, प्रधानमंत्री रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री रोजगार हमी कर्ज योजना, बचतगट कर्ज योजना, पीएम स्वनिधी कर्ज योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनांचा प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आला. रेशन कार्ड वाटप, जातीच्या व उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप केले. आयुष्यमान भारत कार्ड, दिव्यांग कार्ड, बचतगट कर्ज, मनरेगा जॉब कार्डचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.यांत्रिकीकरण व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग यांचा लाभ देण्यात आला. आयुष्यमान भारत कार्ड, गोल्ड, आरोग्य व दिव्यांग कार्डचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...