आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलैला होणार:राज्यभरात 7 लाखांवर विद्यार्थी देणार परीक्षा, अर्जात विद्यार्थ्यांना दुरुस्तीची संधी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करून तीन ते चार महिने उलटूनही परीक्षा नक्की केव्हा होणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर केली असून येत्या 20 जुलैला ही राज्यभरात ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेपूर्वी आवेदनपत्रातील माहितीत काही दुरुस्ती करावयाची असेल तर विद्यार्थ्यांना शाळेच्या लाॅगीनमधून ही दुरुस्ती करता येईल.

परीक्षा परीषदेतर्फे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरात सात लाखांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहेत. तर नाशिकमध्ये इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेकरिता एकूण 37 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहेत. इयत्ता पाचवीसाठी 20 हजार तर आठवीसाठी 17 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 ला घेण्यात येणार होती. मात्र, चार महिने उलटूनही ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष परीक्षेकडे लागले होते. परीक्षेसाठी आवेदनपत्र भरण्याची मुदत संपून तीन महिने उलटूनही विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. अखिल परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात आली असून 20 जुलैला परीक्षा होईल.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ठवी) 2022 मध्ये होणाऱ्या या शालेय शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या परीक्षेचे नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्याकरिता 1 ते 31 डिसेंबर 2021 ही मुदत देण्यात आली होती. तथापी शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता 15 ते 31 जानेवारी 2022 या कालावधित मुदतवाढ देण्यात आली. आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने 20 फेब्रुवारीला होणाऱ्या या परीक्षेच्या आयोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध न झाल्याने ही शिष्यवृती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या

इयत्ता पाचवी- 20302

इयत्ता आठवी- 17074

अशी मिळते शिष्यवृत्ती

इयत्ता पाचवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते तर इयत्ता आठवीच्या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्ष म्हणजेच दहावीपर्यंत दरमहा 150 रुपये शिष्यवृत्ती मिळेल.

बातम्या आणखी आहेत...