आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सजली:शाळेची घंटा वाजली; वह्या-पुस्तके सजली

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे सावट ओसरल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी शाळा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शासनासह विविध सामाजिक संस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला. मनसेच्या वतीने माजी नगरसेवक सलीम शेख यांनी सातपूर येथील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच त्यांना चॉकलेटचे वाटप केले.

सातपूर कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना मनाेरंजनासाठी फुगे देण्यात आले. त्याचबरोबर कॅडबरी व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले असून आता शिक्षकांनी जबाबदारीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे, अशी अपेक्षा सलीम शेख यांनी व्यक्त केली. याचबरोबर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांना ५४ किलो लाडूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे किसनराव खताळे, शांताराम जमधडे, प्रकाश महाजन, शांताराम पाटील, प्रकाश घ्यार, रंगनाथ आंधळे, भगवान ठाकूर, प्रकाश काळे, शंकर पाटील, भास्कर सोनवणे, महिला विभाग अध्यक्ष आरती खिराडकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सातपूर विभाग अध्यक्ष योगेश लभडे, सचिन सिन्हा, विजय अहिरे, ज्ञानेश्वर बगडे, मिलिंद कांबळे, विशाल भावले, श्याम गोहाड, संदेश जगताप, सोमनाथ पाटील, सचिन सांगळे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या शाळेत पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व मुलींना समग्र शिक्षा अभियानांतर्गत क्रमिक पाठ्यपुस्तक संचाचे वाटप शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर, मुख्याध्यापिका प्रियंका निकम, उपमुख्याध्यापिका राजश्री चंद्रात्रे, पर्यवेक्षक शरद शेळके, मनीषा पाटील, पालक-शिक्षक संघाच्या पल्लवी तिडके, सहकार्यवाह मनीषा देशपांडे, ज्येष्ठ शिक्षक सूर्यभान जगताप, ग्रंथपाल अरविंद दिघे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

प्रारंभी पाचवीच्या नवागत विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी तारापूरकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना भविष्यात चांगले शिक्षण घेऊन खूप शिका, मोठे व्हा आणि शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करा असे सांगून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका निकम यांनी शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगून वर्षभरात शाळेत होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या आणि भरपूर बक्षिसे मिळवा, असे आवाहन केले. शासकीय नियम पाहता कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यात आली. सूत्रसंचालन पर्यवेक्षक शरद शेळके यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...