आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी:उद्यापासून वाजणार शाळांची घंटा, स्वागताची जय्यत तयारी

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता त्या पुढील सर्व वर्ग बुधवारपासून (दि.१५) भरणार आहे. कोरोनानंतर यंदा नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाणार असून विद्यार्थ्यांचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. शाळांमध्ये सोमवार व मंगळवारी विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली जात असून शालेय आवार व वर्ग खोल्यांची स्वच्छता करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करत हा प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहे. कोविडमुळे गेली दोन वर्षे शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षणात अडचणी आल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेली. आता मात्र, कोविडचा संसर्ग कमी झाल्याने ऑफलाइन शाळा सुरू होत आहे. त्यामुळे ६ ते १४ वयोगटातील तसेच इतर शाळाबाह्य झालेल्या मुलांचा शोध घेण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे मुख्याध्यापक व शिक्षकांना करण्यात आल्या आहे. शाळापूर्व तयारीच्या कालावधीत या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याचे प्रवेश पूर्ण करावे. दगडखाणी, वीटभट्टी, बांधकामाचे स्थळ, उद्याने, बाजार पेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या ठिकाणी शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जात आहे.

अशा केल्या सूचना
पहिल्या दिवशी शाळेत विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. दोन विद्यार्थ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून प्रवेश दिला जावा. मास्क व सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करावा. शाळेतील वर्ग खोल्या व शालेय प्रांगणाची स्वच्छता करून आरोग्याच्यादृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी. थर्मल स्क्रीनिंगने विद्यार्थ्यांची तपासणी करावी.

बातम्या आणखी आहेत...