आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • The Server At The Registration Office Is Always Down; Demand For Providing Separate Server To Nashik Division For Document Registration |marathi News

मागणी:नोंदणी कार्यालयातील सर्व्हर नेहमी डाऊन; दस्तनोंदणीसाठी नाशिक विभागाला स्वतंत्र सर्व्हर देण्याची मागणी

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुद्रांक शुल्क विभागाच्या दस्त नोंदणी कार्यालयातील सर्व्हर नेहमी डाऊन असतो. त्यामुळे नागरिकांना व्यवहारासाठी ताटकळत बसावे लागते. व्यवहारासाठी बाहेरगावाहून आलेल्या लोकांचा खोळंबा होतो. त्यामुळे नाशिक विभागासाठी स्वतंत्र सर्व्हर द्यावा, अशी विनंती नरेडकोच्या वतीने राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांना करण्यात आली.

यावेळी नाशिक विभागात दस्त नोंदणी कार्यालय कामकाजातील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. दस्त नोंदणी करणारे नागरिक कार्यालयात आल्यानंतर त्यांना सर्व्हर डाऊन सूचित केले जाते. बाहेरगावाहून आलेल्यांना मुक्कामी थांबावे लागते. त्यामुळे वेळेच्या अपव्ययासह आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. या अडचणी दूर करण्यासाठी नाशिकला स्वतंत्र सर्व्हर द्यावा, अशी विनंती केली. दस्त नोंदणी कार्यालय सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावीत. इ-रजिस्ट्रेशन प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यरत करावी. बँका व फायनान्स कार्यालयांना या प्रणालीची माहिती होण्यासाठी पत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवादे, जयेश ठक्कर, शंतनू देशपांडे उपस्थित होते.

टीडीआरचे मूल्यांकन मुंबई महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम अंतर्गत जंगम मालमत्ता या स्वरूपात ग्राह्य धरले जाते. जंगम मालमत्ता, टीडीआरचा दर मागणी व पुरवठा या सूत्राप्रमाणे नेहमी बदलत असतो. त्यामुळे यावर कुठलाही दर लावून स्टॅम्प ड्युटी लादणे गैरवाजवी व कायद्याचे उल्लंघन करणारे ठरते. यातून सर्वसामान्य नागरिकांच्या संवैधानिक अधिकारावर गदा येत आहे. त्यामुळे अवाजवी तरतूद रद्द करावी, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...