आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक नागरिक त्रस्त:पवननगरातील स्टेडियम बनले प्रेमीयुगुलांचा अड्डा; अश्लील प्रकाराने संताप, पोलिस गस्त वाढवावी

सिडको2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील दाट लोकवस्ती व बाजारपेठ म्हणून ओळख असलेला पवननगर भाग हा नेहमीच चर्चेत असतो. सद्यस्थितीत येथील स्टेडियम प्रेमीयुगुल व गुंडगिरीचे आश्रयस्थान बनले आहे. दररोज घडणाऱ्या अनेक गैरप्रकारांमुळे परिसरातील रहिवासी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या सर्व प्रकाराकडे अंबड पोलिस ठाण्याचे गस्त पथक उघड्या डोळ्याने बघून दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पवननगर येथील मैदाने हे मनपाने आरक्षित करीत येथे स्टेडियम उभारले. अनेक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा करून करोडो रुपयांचा निधी मिळवून विकास केला. मात्र, सद्यस्थितीत या ठिकाणी ग्रीन जिम वगळता सर्वच अस्वच्छता, मद्याच्या बाटल्या, सिगारेटचे पाकिटे, तंबाखूजन्य गुटख्याची पाकिटे पडलेली दिसतात. येथे प्रेमीयुगुलांनी भेटण्याचे हक्काचे ठिकाण तयार झाले आहे. या ठिकाणी दिवसभर प्रेमीयुगुल बसून अश्लील चाळे करतात.

त्यामुळे टवाळखोरांनी गर्दीसुद्धा पहायला मिळते. सायंकाळी व सकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला या ठिकाणी फिरायला येतात. त्यांना या सर्व प्रकाराचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. प्रेमीयुगुलांमध्ये अनेकवेळा भांडणे होतात. त्यामुळे येथे हाणामारीसारखे प्रकार घडत असतात. दोन दिवसांपूर्वी एका प्रेमीयुगुलांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन वाद झाल्याने पळापळ झाली होती. त्यामुळे महिलांच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न येथे निर्माण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...