आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘शेल्टर’चा प्रारंभ ; भारती पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातच उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे आयोजित गृहप्रदर्शन ‘शेल्टर २०२२’चे गुरुवारी (दि. २४) डांेंगरे वसतिगृह मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्ते उद्घाटन हाेणार आहे. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘विचार समृद्धीचा... पत्ता नाशिकचा ‘नाशिक नेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात भविष्यातील नाशिकची झलक बघावयास मिळणार आहे. मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये असलेल्या संधी आणि तुलनेने कमी दर यामुळे शहरात रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी शेल्टर प्रदर्शनामुळे ही नामी संधी उपलब्ध असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेल्टरचे समन्वयक कुणाल पाटील यांनी सांगितले की, शेल्टर प्रदर्शनात १०० हून अधिक बिल्डरचे ५०० हून अधिक प्रकल्प, बांधकाम साहित्य, इंटेरिअर तसेच इतर संबंधित व्यवसाय, आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकांसह एकाच छताखाली असणार आहे.

प्रदर्शनात ग्राहकांसाठी बजेट प्रॉपर्टी ते अगदी पॉश अपस्केल डायनॅमिक लक्झरी प्रकल्प, प्लॉट, फार्म हाउस, व्यावसायिक, शाॅप्स याचेदेखील असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत. शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख जितूभाई ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण, सुरेश पाटील, नेमीचंद पोतदार, उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड यांच्यासह कमिटी सदस्य विशेष प्रयत्न करत आहे.

यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ठरणार फायदेशीर : नाशिकला दक्षिणेशी जोडण्यासाठी आणि गुजरातचे महत्त्वपूर्ण शहर सुरतशी नाशिकची जवळीक निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा निर्माणाधीन चेन्नई-सुरत एक्स्प्रेस वे, दिंडोरी औद्योगिक वसाहतीमध्ये लवकरच येत असलेला ३५०० कोटींचा रिलायन्स लाइफ सायन्स प्रकल्प, इंडियन ऑइल प्रकल्प, नाशिकमध्ये विस्तार करणारे देशातील अनेक नवे हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स यामुळे रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी शहरात निर्माण होत आहे. यामुळे भविष्याच्या दृष्टीने रिअल इस्टेटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरणार असल्याचे यावेळी रवी महाजन यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...