आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रमाचे आयाेजन:विविध गाण्यांमधून येशू जन्माची कथा

देवळाली कॅम्प2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येशू मसी येशू मसी जग मे आया है.. शोर दुनिया मे हो गया... अशा प्रभू येशू जन्माची कथा सांगणारी गाणी म्हणत नाशिक युथ फेलोशिपच्या युवकांनी देवळाली कॅम्पला कॅरोलचे गायन केले. ख्रिसमच्या प्रार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले.

येथील जुन्या बसस्थानक परिसरात शनिवारी (दि १७) नाशिक युथ फेलोशिपचे पास्टर फ्रांकलीन अनुप पास्टर आशय लोंढे (झेंबे), अभिजित वरघट, ऋषिकेश मावस, पवन बोर्डे, विशाल खरे, कोमल तेजाळे, कल्पना अनुप, प्रियंका भंडारे आदींनी गायन केले. याप्रसंगी सांथाक्लाॅझ बनलेल्या निखिल त्रिभुवन यांनी उपस्थित बालगोपालांना चॉकलेट व खाऊचे वाटप केले. यानंतर नाशिकरोड, जेलरोड उपनगर परिसरात विविध चौकामध्ये जात या तरुणांनी प्रभू येशू जन्माच्या गाण्यांचे सादरीकरण केले. बालगाेपाळांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

बातम्या आणखी आहेत...