आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:पावसातच डांबरीकरणाचा अजब कारभार; पालिका आयुक्त कारवाई करणार का ? याकडे लक्ष

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खड्डे बुजवताना निकृष्ट साहित्याचा वापर केला जात असताना मंगळवारी (दि. ६) रात्री १० ते १२ वाजेच्या सुमारास सिटी सेंटर माॅल चाैकात भरपावसातच खड्डे बुजविण्यासाठी डांबर आेतले जात असल्याचा अजब कारभार नागरिकांनी बघितल्याने संताप व्यक्त केला.

गणेश विसर्जनाच्या पूर्वी शहरातील सर्व खड्डेमुक्त रस्ते करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले हाेते. त्याची अंमलबजावणी करताना एवढी तत्परता दाखविली जात आहे की, खड्ड्याच्या जागेवरील इतर दगड, माती बाजूला न करता मुरुम टाकला जात आहे. तर काही ठिकाणी केवळ डांबराचा थर टाकून आेबडधाेबड पॅच मारले जात आहेत. तसाच प्रकार सिटी सेंटर माॅलजवळ दिसला. रात्री सुरू असलेल्या पावसातच ठेकेदाराकडून खड्डे बुजविण्याचा कारभार सुरू हाेता. याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी अर्ध्या भागात खड्डे आणि अर्ध्या भागात डांबर असे चित्र पहायला मिळाले. पावसात डांबरीकरणाचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. याबाबत मनपा आयुक्त संबंधित ठेकेदारांविराेधात नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...