आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा उपक्रम:आधाराश्रमात डीपीएस च्या विद्यार्थ्यांनी दिले आनंदाचे दान

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीत घरोघरी दीपोत्सव, फराळाचा गोडवा आणि आनंदाला उधाण आलेले असताना आधाराश्रमातील चिमुरडे मात्र या आनंदापासून दूर असतात. त्यांनाही कौटुंबिक स्नेह मिळावा, त्यांच्यासोबत आनंदाची देवाण-घेवाण व्हावी, या उद्देशाने शहरातील दिल्ली पब्लिक स्कूलच्या (डीपीएसच्या) विद्यार्थ्यांनी आधाराश्रमाला भेट दिली.डीपीएस संस्थेचे संचालक सिद्धार्थ राजघरिया आणि प्राचार्या डॉ. पुष्पी दत्त यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

आधाराश्रमात वेगवेगळ्या संस्था व दानशूर व्यक्तींकडून दिवाळी फराळाची भेट दिली जात असली तरीही सणासुदीच्या आनंदाच्या भेटीपासून येथील बालके वंचित असतात. हा आनंद मिळवून देण्यासाठी डीपीएसच्या विद्यार्थ्यांनी आधाराश्रमात भेट दिली. गप्पागोष्टी करताना येथील मुलांच्या चेह‍ऱ्यावर निर्माण झालेला आनंद अवर्णनीय होता. आनंदाची ही शिदोरी घेऊन डीपीएसच्या विद्यार्थ्यांनी आधाराश्रमाचा निरोप घेतला.

बातम्या आणखी आहेत...