आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये फुटबाॅल सामन्यांचा थरार:जुलैच्या पहिल्या आठवड्यात रंगणार सुब्रताे मुखर्जी कप फुटबाॅल स्पर्धा

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे 2022-जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयाेजन केले आहे. हि स्पर्धा जुलैत पहील्या रंगणार असून त्या दृष्टीने नियाेजन करण्यात येत आहे.

सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सन राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 1 सप्टेंबर ते 17 आक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे.या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यापुर्वी जिल्हा विभाग आणि राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

याच पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील 14 वर्षाखालील मुले आणि 17 वर्षाखालील मुले व मुली या गटांमध्ये फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जुलैत हाेणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणारा 14 वर्षाखालील खेळाडु हा १ जानेवारी 2009 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा तर 17 वर्षाखालील खेळाडु 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

या स्पर्धेत सहभागी होवु इच्छिणाऱ्या सर्व संघांनी दिनांक 28 जुन पर्यंत www.subrotocup.in या संकेतस्थळावर जाऊन सहभागी होणाऱ्या खेळाडुंची तसेच संघाची नोंदणी करुन घ्यावयाची आहे. ज्या संघांची नोंदणीवरील संकेतस्थळावर केलेली नसेल त्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, यांची नोंद घ्यावी. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...