आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय मिळवला:आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत पेठे विद्यालयाचे संघ विजयी

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयाच्या १७ वर्षे वयोगटातील मुले व १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले होते.विजयी संघांची विभागीय पातळीसाठी निवड झाली आहे. मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल आडगावच्या संघावरती २० गुणांनी विजय मिळवून विभागीय पातळीवर आपले स्थान मजबूत केले आहे. तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलींनी अंतिम सामन्यात इंग्लिश स्कूल आडगावच्या संघावर १३ गुणांनी मात करून अंतिम फेरीत विजय मिळवला आहे.

दोनही संघ विभागीय स्पर्धेसाठी सज्ज झाली आहेत. या यशाबद्दल नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, मुख्याध्यापक कैलास पाटील, उपमुख्याध्यापिका संगीता पर्यवेक्षक रवींद्र पगार, शिक्षक प्रतिनिधी व सहकार्यवाह शैलेश पाटोळे, तसेच अप्पर आयुक्त गोलाईत, क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य, गृहपाल, क्रीडा प्रबोधिनीचे क्रीडा मार्गदर्शक जगताप यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक अमोल जोशी व संजय मेहेरखांब यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंना अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. सर्वस्तरातून या विजय संघाचे अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...