आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला @45:राज्यात 13 शहरांतील तापमान 43 अंशांच्या पार, तर अकोल्यात सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मंगळवारी (दि. १०) १३ शहरांतील तापमान ४३ अंशांहून अधिक, तर १७ शहरांतील तापमान ४० अंशांहून अधिक होते. अकोल्यात सर्वाधिक ४५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. काही ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान, आणखी तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहणार असून बुधवारीही (दि.११) राज्यात विदर्भ वगळता ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

विदर्भ, मराठवाड्यात उन्हाची तीव्रता कायम असून पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमानात घसरण झाली आहे. हवामान विभागाने राज्यात ठरावीक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा दिला होता, मात्र कुठेही पावसाची नोंद झाली नाही.

चक्रीवादळ २४ तासांत कमकुवत होईल
बंगालच्या उपसागरात तीव्र असलेले असनी चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीकडे येत आहे. मंगळवारी ते पश्चिम मध्य बंगालच्या उपसागारात पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीपासून बंगालच्या उपसागराकडे जाईल. आगामी २४ तासांत ते कमकुवत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान
अकोला ४५.०, जळगाव ४४.५, वर्धा ४४.५, ब्रह्मपुरी ४४.२, चंद्रपूर ४४.२, वाशिम ४४.०, परभणी ४३.८, अमरावती ४३.६, मालेगाव ४३.४, अहमदनगर ४३.४, नागपूर ४३.२, सोलापूर ४३.०, गोंदिया ४३.०, औरंगाबाद ४२.८, नांदेड ४२.६, उस्मानाबाद ४२.५, बुलडाणा ४२.२, नाशिक ३९.८, पुणे ३७.७, सातारा ३७.४, सांगली ३५.४, कोल्हापूर ३४.१.

बातम्या आणखी आहेत...