आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कुटीवर सेल्फी काढणे जीवावर बेतले:नाशिकमध्ये 2 दुचाकींच्या धडकेत गुजरातच्या तरुणाचा जागीच मृत्यू

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये दुचाकी चालविताना सेल्फी काढणे एका तरुणाला चांगलेच भोवले. यावेळेस झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी, 6 जून रोजी दुगाव रोडवर घडली. अनिल नवसू हिलस (वय 18, रा. मालघर, ता. कपराळा, जिल्हा बलसाड, गुजरात) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत झालेला तरुण
मृत झालेला तरुण

कसा घडला अपघात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हिलम हा तरुण नाशिकहून गिरणारेकडे जात असताना गिरणारेकडून नाशिककडे येणारी स्कुटी (एमएच 15 डीजी 7446) वरील चालक संशयित ध्रुव विनोद राख (रा. पीएनडी काॅलनी, शरणापूररोड) हा दुचाकी चालवताना सेल्फी घेत होता. सेल्फी घेण्याच्या नादात त्याला समोरून येणारी दुचाकी दिसली नाही. त्याने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अनिल हिलम रस्त्यावर पडला. त्यामुळे अनिलच्या डोक्याला गंभार दुुखापत झाली.

उपचारापूर्वीच मृत्यू

गंभीर जखमी अनिल हिलमला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरूच होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आमदार हिरामण खोसकर, वरिष्ठ निरीक्षक सारिका अहिरराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे गिरणारे दुगाव रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.