आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिवस:थीमने ही वस्तुस्थिती विचारात; योग मानवतेसाठी अन‌् आरोग्य संवर्धनासाठी

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ जून हा दिवस जगभरात "आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी योग दिनाच्या दिवशी एक नवीन थीम ठरवली जाते. या वर्षीची थीम ‘मानवतेसाठी योगा’ ही असून या थीमने ही वस्तुस्थिती विचारात घेतली आहे की गेल्या काही वर्षांमध्ये साथीच्या रोगामुळे अनेकांसाठी लक्षणीय मानसिक, शारीरिक आणि भावनिक संघर्ष निर्माण झाला आहे आणि योगाद्वारे चांगल्या आरोग्य पद्धती अंगीकारण्याची अधिक गरज आहे. यानिमित्त नाशिक शहरासह परिसरातील विविध संस्था, संघटना तसेच शाळा व महाविद्यालयात योग शिबिर, यागासने प्रात्यक्षिक असे उपक्रम राबविण्यात आले.

जागतिक योग दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योगपीठ व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र बागुल, मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एस. के. शिंदे, डॉ. सी. डी. शिंदaे, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही.बी. गायकवाड, मराठा हायस्कूलच्य मुख्याध्यापिका के. के. वारुंगसे, प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका व सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. पतंजली योगपीठाचे अध्यक्ष गोकुळ घुगे यांनी योगासनासह प्राणायामाचेे प्रात्यक्षिक करून दाखविले. क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संजय होळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सोपान जाधव, संजय होळकर, कैलास लवांड, अविनाश कदम, बाळासाहेब शिंदे, उद्धव डेर्ले , मंगला शिंदे, बाळासाहेब रायते, सुहास खर्डे, राजेंद्र पोटे, हरिभाऊ डेर्ले आदी उपस्थित होते.

पेठे विद्यालय | नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात आंतराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी ताडासन, वृक्षासन, मकरासन, चक्रासन, प्राणायाम, शशांकासन आदी योगप्रकार सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने योगासने सादर केली. क्रीडाशिक्षक अमोल जोशी यांनी योगासनांची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली. उपक्रमाबद्दल शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड यांनी समाधान व्यक्त केले.याप्रसंगी मुख्याध्यापक कैलास पाटील,उपमुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, पर्यवेक्षक गंगाधर बदादे, शिक्षक प्रतिनिधी शैलेश पाटोळे, शर्मिला खानीवाले,दीपक कडाळे यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

के. बी. एच. विद्यालय
नाशिक गंगापूररोड येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात महिला कल्याण व तक्रार निवारण समिती यांच्या वतीने क्रीडाशिक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडाशिक्षक प्रमोद पाटील यांनी ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, आदी योगासनांचा विद्यार्थ्यांकडून सराव केला.पर्यवेक्षक रमेश बागूल आणि ज्येष्ठ शिक्षक प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जिवनात योगाचे असलेले महत्त्व विशद केले. मुख्याध्यापक कुणाल गोराणकर, शिक्षक प्रतिनिधी सुजाता पवार, महिला कल्याण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा क्रांती देवरे प्रमुख अतिथी होते. सूत्रसंचालन प्रकाश नरोडे यांनी केले. शैला सोनवणे यांनी आभार मानले.

मानवधन संस्थेत योगसाधना
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळेत योगसाधना या प्रात्यक्षिक कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी योग प्रशिक्षक रमाकांत जाधव, संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे व संस्था सचिव तथा शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे उपस्थित होते. योग प्रशिक्षक रमाकांत जाधव यांनी योग प्रात्यक्षिकाद्वारे विविध आसनांचे प्रकार विद्यार्थ्यांकरवी करवून घेतले. योग म्हणजे आपल्या शरीरातील पंचतत्त्वांना योग्य रितीने चालविण्याची सुयोग्य क्रिया. आरोग्याचा मूलमंत्र हा योग आहे, असे प्रकाश कोल्हे यांनी म्हटले. प्रशिक्षक रमाकांत जाधव यांनी आरोग्य संवर्धनासाठी योगाचे महत्त्व विशद केले.

सारडा कन्या शाळेत आसनांची प्रात्यक्षिके
नाशिक | नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या शाळेत योग दिन
उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळ सत्रात पाचवी ते सातवी योगशिक्षिका राधिका आंभोरे यांनी योगाचे महत्त्व सांगितले. आसनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. शिक्षिका संगीता आंभोरे यांनी आरोग्याच्या दृष्टीने योगाचे महत्त्व विशद केले.आणि विद्यार्थिनींकडून प्रात्यक्षिके करून घेतली.

मुख्याध्यापिका प्रियंका निकम, उपमुख्याध्यापिका राजश्री चंद्रात्रे, पर्यवेक्षक शरद शेळके, मनीषा पाटील, सहकार्यवाह मनीषा देशपांडे, यांचे उपस्थित होते. नियोजन क्रीडाशिक्षिका सुनीता कासार विलास बैरागी यांनी केले. शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, सातपूर
सातपूर | विविध विकास संघटना संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय माध्यमिक शाळेमध्ये जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. निवृत्त क्रीडा शिक्षक योगाचार्य बी. आर. शिंदे यांनी विद्यार्थ्यांकडून तसेच शिक्षकांकडून योगाचे तसेच प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार करून घेतले. मुख्याध्यापक मधुकर पवार यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रल्हाद रायते यांनी सूत्रसंचालन केले.

कर्णबधिर मुलांनीही केला योगा
नाशिक | महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयाच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांनीही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा केला. योग विद्या धाम येथील योग शिक्षक संजय जाधव व त्यांची सहकारी सिद्धी बोरसे यांनी वज्रासन, त्रिकोणासन, भुजंगासन, पवनमुक्तासन यासारखी अनेक योगासनांचे प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेतले. मुख्याध्यापक संतोष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

शायनिंग स्टार अकॅडमी
नाशिक | शायनिंग स्टार अकॅडमीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. योगशिक्षिका नयना संत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगा प्रात्याक्षिके सादर करून साजरा करण्यात आला. विविध आसनांची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. एकाग्रता, ग्रहणशक्ती, आकलनशक्ती कल्पनाशक्ती, स्मरणशक्तीसाठी याेगा महत्वाचे असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. मुख्याध्यापिका गीता व्यास, संचालक हेमंत व्यास, उपमुख्याध्यापिका विनुथा सहा व शाळेतील इतर शिक्षकवृंद यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. आंतरराष्ट्रीय योग दिवस या कार्यक्रमाची सांगता विश्वकल्यानात्मक प्रार्थनेने
करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...