आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:तत्कालीन प्रशासनाधिकारी उपासनींच्या चौकशीला वेग ; शाळेच्या कामकाजाकडे दुर्लक्ष

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वर्षांपूर्वीच्या विविध आरोपांच्या अनुषंगाने महापालिकेच्या शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांच्या खात्यांतर्गत चौकशीची कागदपत्रे शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे उपासनी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्कालीन प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांच्यावर फायलींचा निपटारा न करणे, शाळेच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करणे, निधी खर्च न करणे तसेच विविध कारणांच्या अनुषंगाने आरोप ठेवत खात्यांतर्गत चौकशी सुरू केली होती. या चौकशीच्या अनुषंगाने प्रशासन विभागाने शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे प्रस्ताव सादर केला होता. २०१८ मध्ये यासंदर्भात प्रस्ताव सादर केल्यानंतर तब्बल चार वर्षांनी तेही शिक्षण संचालक कार्यालयाकडून मनपाला अंतिम स्मरणपत्र पाठवले. शासनाने या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू करण्याबाबत मनपाकडे कागदपत्रांची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...