आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाइक रेसिंगचा थरार:रोमहर्षक वातावरणात शहरात एमआरएफ सुपरक्राॅस स्पर्धेचा थरार

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षणाक्षणाला पुढे जाण्याची लागलेली धडपड.... जंप्स व टेबल टाॅपवरून उंच झेप घेणाऱ्या रेसिंग बाइक... विदेशातून खास आलेल्या रायडर्सची डाेळ्याचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके अन् प्रेक्षकांची त्यास मिळणारी टाळ्या व शिट्यांची दाद अशा रोमहर्षक वातावरणात शहरात एमआरएफ सुपरक्राॅस स्पर्धेचा थरार नाशिककरांनी अनुवभला. या स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या लढतीत टीव्हीएस रेसिंग टीमचा सी. डी. जिनानने विजेतेपदावर आपले नाव कोरले. एम आर एफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेत शहरातील पेठेनगर येथील पेठे इस्टेट येथे रविवारी (दि.१) आयोजन करण्यात आले होते. एसएक्स १ या विदेशी व देशी बनावटीच्या मोटारसायकलसाठीच्या गटाची स्पर्धा पाहण्यासाठी दुपारपासून माेठ्या संख्येने गर्दी केली होती. स्पर्धेसाठी सुपरक्रॉस हा कृत्रिमरीत्या बनवलेल्या मार्गावर १२ जंप्स, १ टेबलटॉप व १ कट टेबलटॉप साकारण्यात आले होते. या ट्रॅकवर वेगाने जाणाऱ्यांसाठी बाइक रायडर्सचे कसब पणाला लागले होते.

*क्लास १ एसएक्स २, ५०० सीसीपर्यंत : जिनान (प्रथम) , ऋग्वेद (द्वितीय) * क्लास २ एसएक्स २, ५०० सीसी : अजय श्रीनिवास (प्रथम), जितेंद्र सांगावे (द्वितीय) * क्लास ३ नोव्हाइस २६० सीसी- बंटी (प्रथम) , नाथ (द्वितीय) * क्लास ७ जुनियर एसएक्स २५० सीसी : श्लोक घोरपडे (प्रथम), जितेंद्र सांगावे (द्वितीय), * क्लास ८ जुनियर एसएक्स १०० सीसी : अक्षत हुपाले (प्रथम), जिना शेख (द्वितीय) , भैरव सी (तृतीय).

स्टंटचा थरार दर्शकांनी अनुभवला. एफएमएक्स म्हणजे फ्रीस्टाइल माेटाेक्राॅस माेटारसायकल स्टंट. बाइकचा हवेतील हा स्टंट आहे. स्टंटचे हे छायाचित्र मल्टी एक्स्पाेज केले असून एक मिनिटात या तंत्रात ६ फाेटाे क्लिक होतात. ते नंतर जाेडले जातात.

105 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला

12 जंप्स 01 टेबलटॉप 01 कट टेबलटॉप बाइकसाठीच्या एमआरएफ सुपरक्राॅस स्पर्धेचा थरार रविवारी नाशिककरांनी अनुभवला. शहरातील पेठेनगरातील पेठे इस्टेट येथे ही स्पर्धा पाहण्यासाठी दुपारपासूनच गर्दी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...