आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठा गाैरीचे स्वागत:गाैराई पूजेसाठीचा मुहूर्त आज सकाळी 6 ते सायं. 7.39 पर्यंत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारंपरिक गौरी गीते गात माेठ्या थाटामाटात शनिवारी (दि.३) ज्येष्ठा गाैरीचे स्वागत झाले. सायंकाळी सुवासिनींनी वाजत गाजत आलेल्या गाैराईचे दारात पूजन करत घरात स्थापना केली. यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली. गाैरी पूजनाचा मुहूर्त रविवारी (दि. ४) सकाळी ६ वाजेपासून सांयकाळी ७.३९ पर्यंत असल्याचे पुराेहित व गाेदावरी मंदिराचे पुजारी आलाेक गायधनी यांनी सांगितले.

दाेन वर्षांपासून उत्सवावर काेराेनाचे सावट हाेते. यंदा मात्र सर्व निर्बंध हटल्याने घराेघरी माेठ्या उत्साहात गाैरीचे आवाहन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेत शनिवारी गौरीचे ढाेल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. उंबरठ्यावर धान्य भरलेले माप ओलांडून गौरींना गणपती, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवत घराेघरी पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘गौरी कशाच्या पाऊली आली गं, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली गं’ असे गीत म्हणत गाैरीचे स्वागत केले. काही ठिकाणी या गौरी पाटावर विराजमान झाल्या तर काही ठिकाणी उभ्या गौरी, बिन हाताच्या उभ्या आणि खड्यांच्या गाैरींची स्थापना करण्यात आली. फुलवरा, नव्या साड्या, दागिने, फुले-फळे यांची सजावट करण्यात आली.

व्रत यासाठी करतात
गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला अशी आख्यायिका आहे. याचमुळे अखंड सौभाग्यासह सुख, समृद्धी प्राप्तीसाठी या ज्येष्ठा गौरी व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात पूजन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...