आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वणी, दिंडोरी:ट्रॅक्टर कारवर उलटला; मायलेकीसह 6 मजूर ठार, मुळाणे घाटात भीषण अपघात, 16 जण जखमी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्राॅली कारवर उलटल्याने झालेल्या अपघातात ट्रॉलीमधील सहा जण ठार झाले. यात मायलेकींसह एका दाम्पत्याचा समावेश आहे. सर्व मृत जळगाव जिल्ह्यातील आहेत. १६ जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यातील सहा गंभीर जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतांची संंख्या वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील हे मजूर दिंडोरी तालुक्यातील संगमनेर येथून रस्त्याच्या कामासाठी जात असताना गुरुवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह समोरून येणाऱ्या कारवर उलटला. कारमधील तिघांनी समोर काळ दिसताच गाडी कडेला थांबवून उड्या मारल्या, पण या अपघातात ट्रॅक्टर ट्राॅलीतील सहा जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मजूर कळवण तालुक्यातील काम आटोपून दिंडोरी तालुक्यातील कामावर येत असताना हा अपघात झाला. १७ जखमींपैकी तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. यात एका बालिकेचा समावेश आहे. तीन जणांचा वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर काही वेळ महामार्गावर कोंडी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...