आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान टळले:झाडाची फांदी रस्त्यात काेसळल्याने सातपूरला वाहतूक विस्कळीत

सातपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवर श्रीराम चौक येथे मंगळवारी (दि ७) सायंकाळी सातच्या दरम्यान दुभाजकामधील झाडाला कंटेनरचा धक्का लागल्याने झाडाची फांदी रस्त्यावर पडली, सुदैवाने मागील येणाऱ्या चारचाकी वाहनाने वेळीच वाहन थांबवल्याने नुकसान टळले. मात्र रस्त्याच्या मधाेमध फांदी पडल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली हाेती. अग्निशमन दलाने ही फांदी कापून रस्ता मोकळा केला. शहरात दोघा नागरिकांचा मृत्यू झाल्यावर धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम शहरात करण्यात आले, मात्र त्र्यंबकेश्वर रोडवर दुभाजकवरील फांद्या वरवर छाटण्यात आल्या मंगळवारी कंटेनरचा वरच्या भागाचा धक्का लागून फांदी जोरात पडली,या भागांत रस्त्यावर भाजी बाजार व इतर अतिक्रमण असल्याने वाहतूक सावकाश होत असल्याने मागील वाहने सावध झाल्याने नुकसान टळले. धोकादायक फांद्या नियमित छाटण्यात याव्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...