आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनुवाद म्हणजे दोन्ही भाषा, संस्कृती, प्रांत यांना जोडणारा पुल आहे. अनुवाद करताना अनुवादकाने दोन्ही भाषा आंतरिक मनाने समजून घेत भाषेचे सौंदर्य जपत अनुवाद करावे, असे मत 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमलेनात 'भारतीय व जागतिक साहित्य विश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक' या विषयावर आयोजित परिसंवादात उपस्थित व्यक्त्यांनी सूर मांडला.
भारतासारख्या आखडप्रय देशात विविध जात, धर्म, भाषा असल्यातरी आज देश एकसंघ आहे. 17 व्या शतकात अनुवादाची सुरुवात झाली. मराठी साहित्य असे एकमेव आहे की ज्याचा अनुवाद जगातील सर्व भाषेमध्ये झाला आहे. कोसला, बलुत, अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा तर झेक, रशियन,फ्रेंच, जर्मन या भाषेत अनुवाद झालेला आहे. मराठीच्या साहित्याला फार जुनी परंपरा तर संत ज्ञानेश्वर ते संत चोखामेळा पासून आहे. आज भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन आशावादी झालेला आहे. एक उभरते नेतृत्व म्हणून भारताकडे जग बघत आहे. भारतातील साहित्य हे जगापलीकडे नेण्याचे किमया ही अनुवादाने केली आहे. यामध्ये मराठी साहित्याचा वाटा सर्वात जास्त आहे.
गातील पहिले अनुवादित पुस्तक 1841 साली जॉन बेनन याचं मराठीमध्ये यांत्रिकीकरण हे हरी केशव यांनी मराठीमध्ये केले. तर पाहिले यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पदमजी अनुवादित केली आहे. गीतांजली यांनी केलेल्या अनुवादित पुस्तकाला बुकर्स चा पुरस्कार प्राप्त झाला. शांता गोखले यांनी अनुवादित केलेल्या लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाला साहित्य अकादमी दिल्लीचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती डॉ. बळीराम गायकवाड यांनी दिली.
अरुणा जोशी यांनी आपले विचार मांडताना त्या म्हणाला, भारतीय साहित्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन समजून घेऊन त्यानुसार अनुवदकाने लेखन करणे गरजेचे आहे. मैलीक विचार ज्या साहित्यात जगात मान्यता मिळत आहे. जगात मराठी साहित्यची मागणी असलेले संत साहित्य, दलित साहित्य, आधुनिक नाटके, कविता, स्त्री साहित्य हे जास्त करून अभ्यासले जातात. यावरून या क्षेत्रात वैचारिक लेखन करणे अपेक्षित आहे. मराठी साहित्य हे जगात सर्व दूर अभ्यासले जाणारे साहित्य अजरामर आहे, त्यामुळे मराठी साहित्याला महत्व प्राप्त झाले आहे. संपर्क, दळवळनासाठी दोन्ही भाषा समजून घेणं गरजेचं आहे, यासाठी अनुवाद समजून घेणे गरजेचे आहे, असेही अरुणा जोशी यांनी सांगितले.
अध्यक्ष डॉ.विनया बापट यांनी आपले विचार मांडताना, अनुवाद करताना कोणत्या गोष्टी कडे विशेष लक्ष द्यावे, याची माहिती दिली. भारत स्वतंत्र झाल्यापासून लेखकावरील वसाहतिक मानसिकतेतून अनुवाद बाहेर येत आहे. ऐतिहासिक, व्यावहारिक घटनेमुळे इंग्रजीचे वर्चस्व जगभर होऊ लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.