आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाळाआणिआइस्क्रिम हे घराघरातील अगदीआबालवृद्धांपर्यंतचे अतूट नाते असून गेली दोन वर्षे मात्र कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे तसेच कोरोनाआणि थंड खाणे, पिणे यांचा संबंध जोडला गेल्याने सलग दोन वर्षे आईस्क्रीम उद्योग अडचणीत होता. यावर्षी अगदी जानेवारी महिन्यात तिसरी लाट आणि मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याने यंदाहीआइस्क्रीमला मागणी कमीच असेल असा विचार केलेल्या आईस्क्रीम उद्योगाला अचानक फेब्रुवारी महिन्यापासून खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आलेआहेत.आइस्क्रीमची मागणी पंधरा टक्क्यांनी वाढल्याने तर कच्च्या मालाची उपलब्धताही सहज होत नसल्याने उद्योगांची धांदल उडाली आहे. दरवर्षी नाशिक जिल्ह्यात सर्वच आईस्क्रीम कंपन्यांची उलाढाल किमान ५० कोटी रुपयांची असते. त्यात दरवर्षी १५ टक्के नैसर्गिक वाढ गृहित धरली जाते. मात्र २०२० ते २१ या दोन वर्षांत लॉकडाऊनमुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स, मिठाईची दुकाने,आइस्क्रीम पार्लर लॉकडाऊनमध्ये दीर्घकाळ बंद होते. वेगवेगळ्या निर्बंधांमुळे लग्नकार्य, स्नेहसमारंभ, बर्थडे पार्ट्या सगळेच बंद होते. याचा विपरीत परिणामआइस्क्रीमच्या विक्रीवर झाला व मागणी थाट ५० टक्क्यांनी घटली होती.
मात्र, यावर्षी बहुतांश निर्बंध हटवले गेल्याने पुन्हा सगळे सण-समारंभ, पार्ट्या, उत्सव, रेस्टॉरंट्स सुरू झालेआहेत तर उन्हाळाही कडाक्याचा जाणवू लागलाआहे. यामुळेआइस्क्रीमची मागणी २०१९ च्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढलीआहे. तर गाईचे दूध जे मागील महिन्यात ३० रुपये लिटरआणि मिल्क पावडर २०० रुपये किलोने मिळत होती, तीचआज अनुक्रमे ४२ रुपये लिटर आणि ३२५ रुपये किलोवर पोहोचलीआहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.