आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाचे स्वागत:शहरातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच गर्दी, निराेगी जीवनासाठी साकडे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात अनेकांनी देवदर्शनाने केली. त्र्यबंकेश्वर, नाशिकचे कपालेश्वर मंदिर, नवश्या गणपती, तपाेवनातील नव्यानेच निर्माण झालेले स्वामी नारायण मंदिर, लाखाे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले काळाराम मंदिर, सांडव्याची देवी आदी मंदिरांमध्ये भाविकांची सकाळपासून गर्दी झाली हाेती. रविवार व नववर्षाचा पहिला दिवस अशी पर्वणी भाविकांनी साधली.

२०२३ या नव्या वर्षात मोठ्या आशा आकांक्षा घेऊन प्रवेश केला आहे. हे नवं वर्ष आरोग्यदायी, आर्थिकदृष्ट्या भरभराटीचं आणि सर्व अपेक्षा पूर्ण करणारं जावो ही प्रार्थना करण्यासाठी भाविक मंदिरांमध्ये पाेहाेचले. नवश्या गणपती मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आला. कपालेश्वर मंदिरात सकाळी विविध धार्मिक विधी पार पडले. मंदिरात पहाटेपासून भाविकांची रांग लागली हाेती. तर शिर्डीतही साईंची उपासना करण्यासाठी हजारो भाविक नाशिकमार्गे रवाना झाले. त्यामुळे नाशिकराेडचे बसस्थानक, द्वारका सर्कलवर प्रवाशांची सकाळपासून गर्दी झाली हाेती.

नववर्षाच्या पहिला दिवस प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो. कोणी पार्टी करतं तर कुणी परिवारासह ट्रीपला जातं तर भक्तगण मंडळी आपापल्या श्रद्धास्थानी दाखल होत असतात. पंढरपूर, शिर्डी असो वा शेगाव असो याठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक माथा टिकवण्यासाठी येत असतात. नाशिकचे भाविक देखील यासह विविध धार्मिक स्थळी गेले हाेते.

बातम्या आणखी आहेत...