आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स गर्लफ्रेंडला दुसऱ्या मुलासोबत पाहिल्याने राग अनावर:भररस्त्यात तरुणीला व तिच्या मित्राला मारहाण; दुचाकी, मोबाइल लुटून प्रियकर पसार

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक्स गर्लफ्रेंडला दुसऱ्या तरुणासोबत पाहिल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीसह तिच्या मित्राला भररस्त्यात बेदम मारहाण करत दोघांचे मोबाइल आणि दुचाकी लुटून नेली. रवीशंकर मार्गाजवळ हा प्रकार घडला. संशयित रोहित शशीकांत काळे (रा. रेणुका नगर) याच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात विनयभंग, लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे संशयित रोहित काळे याच्यासोबत प्रेमसंबध होते. काही कारणामुळे तरुणीने दोन ते तीन महिन्यांपासून त्याच्यासोबतचे संबध तोडले. पीडित युवती आणि तिचा मित्र दोघे पाथर्डी फाटा येथे नोकरीसाठी चौकशी करण्यासाठी गेली होती. वडाळा रोड मार्गे फेम टॉकीकडे जात असताना एका हॉटेलच्या मागे श्री रवीशंकर मार्गवर संशयित रोहित काळे याने त्या दोघांचा पाठलाग केला.

अश्लील शिवीगाळ केली

रोहितने त्याची दुचाकी आडवी लावून. तरुणीला अश्लील शिविगाळ करत तू घरा बाहेर कशी आली, असे बोलून तिच्या कानशिलात लगावली. तरुणीला सोडवण्यास गेलेल्या तिच्या मित्रालाही संशयिताने मारहाण केली. त्याने दोघांच्या हातातील मोबाइल हिसकावून नंबर नसलेली दुचाकी असा 70 हजार किमतीचा ऐवज बळजबरीने लुटून नेला. पीडित युवतीने तरुणीने पोलिसांत तक्रार केली असून वरीष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संशयिताच्या मागावर पथक

तक्रार दाखल होताच गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयिताचा शोध घेतला. मात्र, संशयिताला पोलिसां तक्रार दिल्याची माहिती मिळताच त्याने शहरातून पळ काढला. तसेच संशयित आरोपी मुंबईला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पाळत ठेवून मारहाण

संशयिताचे आणि पीडीत तरुणीचे पूर्वी प्रेमसंबध होते. संशयिताच्या वागण्यामुळे तरुणीने त्याच्यासोबतचे संबध तोडले. संशयिताच्या धाकामुळे तरुणी घराबाहेर येत नव्हती. मात्र, नोकरी शोधण्यासाठी ती ओळख लपवत मित्राच्या दुचाकीहून जात असताना संशयिताने पाळत ठेवत पाठलाग करत तिला मारहाण केली. दुचाकी तरुणीच्या मित्राची असल्याची माहिती सूत्रांनी दिली

बातम्या आणखी आहेत...