आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची कारवाई:भालेकर मैदानावरील पाळणे अखेर हटवले

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बी. डी. भालेकर मैदान आणि आताच्या वाहनतळाच्या जागेवर होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी. छोटे पाळणे लावण्याची परवानगी घेत मोठे इलेक्ट्रिक रहाटपाळणे लावल्याने यावर मंडळांकडून आक्षेप नोंदविण्यात आला हाेता. त्याची दखल घेत शुक्रवारी (दि. २) पालिकेकडून हे पाळणे हटवण्यात आले. दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होऊ शकला नाही.

कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने निर्बंध हटविल्याने यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यानुसार शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उंच गणेशमूर्तीबरोबरच देखावे आणि आरास उभारल्या आहेत. भालेकर मैदानावरील सात गणेश मंडळेही त्यास अपवाद नाही.

बातम्या आणखी आहेत...