आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांडग्यास जीवदान:भालूर येथे साठ फूट खोल विहिरीत पडलेल्या नर लांडग्यास ग्रामस्थांनी दिले जीवदान

मनमाड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भालूर येथील ६० फूट खोल विहिरीत पडलेल्या लांडग्याला वाचवण्यात ग्रामस्थ व वन विभागाने प्रयत्नांना यश आले. भालूर येथील चिंधा भिलारे हे सकाळच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीत आवाज ऐकू आला. आत पाहिले असता विहिरीत लांडगा पडला असल्याचे त्यांना दिसून आले. लांडग्यास बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण ते असफल झाले. त्यानंतर त्यांनी वन विभागाशी संपर्क केला. त्यानंतर मनमाड व नांदगाव वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विहिरीत जाळी सोडली, त्याला सुरक्षित बाहेर काढले. अंदाजे ५ वर्षे वयाचा नर लांडगा होता.

बातम्या आणखी आहेत...