आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला त्रस्त:सिडकाेत दुसऱ्या दिवशीही फुटली जलवाहिनी‎

सिडको‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपेंद्रनगर परिसरात गॅस पाइपलाइनच्या‎ कामासाठी सुरू असलेल्या कामामुळे‎ सलग दुसऱ्या दिवशीही जलवाहिनी‎ फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा‎ अपव्यय तर झालाच मात्र यामुळे या‎ संपूर्ण परिसरात पाणी पुरवठा‎ विस्कळीत झाल्याने नागरिक विशेषत:‎ महिला हैराण झाल्या आहेत. शनिवारी‎ फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती‎ पालिकेने रविवारी (दि. ५) केलीच‎ नाही. त्यामुळे संतप्त माजी‎ नगरसेविका प्रतिभा पवार यांनी‎ रहिवाशांसाेबत हे काम बंद पाडले.‎ उपेंद्रनगर भागात अंबड लिंकरोड‎ हा मुख्य रहदारीचा रस्ता असून या‎ भागात बांधकाम विभागाच्या वतीने‎ काही दिवसांपासून पिण्याच्या‎ पाइपलाइनचे काम सुरू आहे ते‎ अर्धवटच साेडण्यात आले आहे.‎

याठिकाणचे खड्डे बुजवण्यात आलेले‎ नाहीत. त्यातच गॅस पाइपलाइनचे काम‎ सुरू करण्यात आले आहे. शनिवारी व‎ रविवारी या ठिकाणी गॅस पाइपलाइनचे‎ काम सुरू असताना जलवाहिनी‎ फुटल्याने उपेंद्रनगरसह शुभम पा र्क,‎ बुरकुले लाॅन्ससह, उत्तमनगरच्या काही‎ भागात अनेक ठिकाणी पाणीच न‎ आल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात‎ पाण्यासाठी व वणवण भटकावे‎ लागले.‎

कामाची परवानगी‎ दिलीच कशी
‎ अंबड लिंकराेड मुख्य‎ रहदारीचा रस्ता असून या‎ ठिकाणी या कामासाठी‎ परवानगी दिलीच कशी?‎ नियम धाब्यावर बसवून‎ सर्व मनमानी सुरू आहे.‎ यावर आयुक्तांनी तातडीने‎ कारवाई करावी, अन्यथा‎ आंदाेलन करावे लागेल.‎ सलग दुसऱ्या दिवशी ताेच‎ प्रकार घडल्याने याला‎ जबाबदार काेण?-‎ प्रतिभा पवार, माजी‎ नगरसेविका‎

बातम्या आणखी आहेत...