आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समरसता साहित्य संमेलन:सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे यांची अध्यक्षपदी निवड; जुलैमध्ये आयोजन

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समरसता साहित्य परिषदेचे समरसता साहित्य संमेलन नागपूरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

दोन आणि आणि तीन जुलै असे दोन दिवस हे संमेलन होणार आहे. समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि संमेलनाचे निमंत्रक डॉ. ईश्वर नंदपुरे, कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, समरसता साहित्य संमेलनाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे तसेच प्रकाश एदलाबादकर, डॉ. सुधाकर इंगळे, डॉ. शंकर वानखेडे, डॉ. विजय राठोड ज्येष्ठ साहित्यिक कै. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि कार्य हा संमेलनाचा केंद्रीभूत विषय आहे. या संमेलनात अण्णा भाऊंच्या साहित्यातील विविध पैलूंवर, मराठी साहित्यातील समरसता यावर विविध परिसंवाद होतील.

याशिवाय निमंत्रितांचे कविसंमेलन मुक्त काव्यमंच, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती होतील. तसेच ग्रंथ प्रदर्शन , रांगोळी प्रदर्शन समरसता चित्र प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमही होणार आहेत. नाशिक मधील समरसता साहित्य परिषदेचे प्रा. गजानन होडे (7972770154) नाना बच्छाव (9404270801) यांनी संमेलना बद्दल माहिती दिली

बातम्या आणखी आहेत...