आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिकांची मनपाकडे तक्रार‎:उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम रखडले‎

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎दिंडोरीराेड येथील श्रीरामनगर उद्यानाची अत्यंत‎ दुरवस्था झालेली आहे. काही वर्षांपूर्वी मोठ्या‎ थाटामाटात या उद्यानाचा नूतनीकरणाचा‎ कार्यक्रमदेखील करण्यात आला हाेता. मात्र,‎ उद्यान नूतनीकरणाचे काम अतिशय संथगतीने‎ सुरू असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्न‎ निर्माण झाले आहे.याबाबत स्थानिकांनी तक्रारी‎ करूनही अधिकाऱ्यंाकडून याबाबत काेणतीही‎ पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त‎ केला जात आहे.‎ स्थानिक नागरिकांनी वारंवार ठेकेदाराला व‎ महापालिकेकडे विचारणा केली असता‎ लवकरच काम पूर्ण होईल असे सांगण्यात येते.‎

या परिसरातील ज्येष्ठ नागरिक व लहान‎ मुलासाठी हे उद्यान कधी पूर्ण होणार याकडे‎ सर्वांचे लक्ष लागलेले आहे. उद्यानाच्या‎ नूतनीकरणासाठी येथे असलेला दरवाजासुद्धा‎ गायब झालेला असून संरक्षण जाळीसुद्धा‎ मोडलेली आहे.‎उद्यानाची साफसफाई गेली अनेक‎ महिने झालेली नाही. तसेच येथे‎ अस्वच्छता पसरलेली असल्याने डास‎ भरपूर प्रमाणात झाले आहे. त्यामुळे‎ स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात‎ येण्याची शक्यता आहे. लवकरात‎ लवकर उद्यानाचे काम पूर्ण करावे व‎ स्थानिक नागरिकांसाठी खुले करावे.‎

बातम्या आणखी आहेत...