आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 किमीचा वळसा:नाल्यावरील पुलाचे काम रखडले; रहिवासी त्रस्त‎

सिडकाे‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या सिडकोतील महाराणा प्रताप‎ चौकाजवळच्या आर्यावर्त सर्कल ते‎ महाले फार्म या रस्त्यावरील नाल्यावर‎ महापालिकेकडून पूल बांधण्याचे काम‎ अनेक महिन्यांपासून सुरू असून ते‎ अतिशय संथ सुरू असल्याने‎ परिसरातील रहिवाशी त्रस्त झाले‎ आहेत. नागरिकांना आपल्या परिसरात‎ जाण्यासाठीही एक किलाेमीटरचा‎ वळसा घ्यावा लागताे आहे.‎ पालिकेच्या बांधकाम विभागाच्या‎ बेजबाबदारपणामुळेच हे काम‎ रखडल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.

आता नागरिकांनी आंदाेलनाचा‎ इशारा दिला आहे.‎ आर्यावर्त सर्कल, महाले फार्म भागात‎ किमान १० ते १५ हजार लाेकसंख्येच्या‎ रहिवाशी साेसायट्या आहेत. याच‎ ठिकाणी नाल्यावर पूल टाकून रस्ता‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रुंदीकरणाचे काम मनपाने हाती घेतले‎ आहे. मात्र, या रस्त्यावर केलेल्या‎ खोदकामामुळे महाराणा प्रताप‎ चौकाकडे जाण्यासाठी वळसा घालून‎ जावे लागते. दुचाकी वाहनांसाठी‎ बाजूलाच असलेल्या जलकुंभाच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आवारातून एक अरुंद पर्यायी रस्ता‎ केलेला आहे. परंतु तो रस्ता खूप अरुंद,‎ उंचसखल व वळणाचा आहे. तसेच‎ वाहनांची ये- जा सुरू असल्यामुळे ताे‎ वापरणेही धाेक्याचे हाेत चालले‎ आहे.‎

६ महिन्यांपासून काम जैसे थे‎
‎नाल्यावरचे पूल‎ बांधण्याचे काम‎ सहा महिन्यांपासून‎ रखडले आहे. -‎संदिप देवरे,‎रहिवासी‎

बातम्या आणखी आहेत...