आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मितहर्ष संस्थेचा उपक्रम‎:कार्यशाळेतून मिळणार महिला,‎ युवतींना उद्याेगाबाबत मार्गदर्शन‎

नाशिक‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योग क्षेत्रात युवती व महिलांचा सहभाग‎ वाढावा यासाठी शासन स्तरावरुन विशेष‎ प्रयत्न सुरू असून, आता कामगार शिक्षण‎ बोर्ड, भारत सरकार आणि स्मितहर्ष‎ एज्युकेशन अकॅडमी, नाशिक यांच्या‎ संयुक्त विद्यमाने महिलांसाठी एक‎ दिवसीय मोफत उद्योजकता विकास‎ कार्यशाळेचे आयोजन बुधवारी (दि.८)‎ करण्यात आले आहे.‎ ‎ शनी मंदिर, शिवाजी चौक, सिडको येथे‎ सकाळी १०.३० ते सायं. ५ वाजे पर्यंत‎ उपक्रम सुरू असेल.

त्यात डिजीटल‎ लिट्सी, भारत सरकारच्या विविध योजना‎ आणि महिलांसाठी आवश्यक कायद्यांची‎ माहिती व स्वसंरक्षणासाठी कराटे‎ प्रात्यक्षिकेही सादर केली जातील.‎ कार्यक्रम महिलांसाठीच असून १८ ते ४५‎ वयोगटातील महिलांना प्राधान्य असेल.‎ येतांना आधार कार्डची झेरॉक्स सोबत‎ आणावी, असे सोनल प्रविण तिदमे यांनी‎ कळविले आहे. अधिक माहितीसाठी‎ प्रा. राजेश बेदमुथा ९९२३५०३१३१ या‎ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन‎ कामगार शिक्षण बाेर्डाने केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...