आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाची हत्या:पेट्रोल टाकून तरुणाला जाळले; एकास जन्मठेप

इगतपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंगावर पेट्रोल टाकून तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी जन्मठेप आणि ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कुणाल किशोर हरकरे (२८ इगतपुरी) असे आरोपीचे नाव आहे.

२३ सप्टेंबर २०१८ रोजी इगतपुरीच्या कोकणी मोहल्ला येथे दीपक खंडू बोरसे, प्रशांत ऊर्फ लखन खंडू बोरसे हे भाऊ गणपती विसर्जनाची तयारी करत होते. या वेळी आरोपी कुणाल किशोर हरकरे याने दीपक बोरसे, प्रशांत बोरसे या भावांसोबत वाद घातला. या भागातील नागरिकांनी हा वाद मिटवला. रात्री सुरेश प्रभूदयाल गुप्ता ऊर्फ बबली शेठ आणि बोरसे बंधू गल्लीत गप्पा मारत होते. याचवेळी संशयित आरोपी कुणाल हरकरे याने दुपारच्या भांडणाचा राग मनात धरून लखन बोरसेवर पेट्रोल टाकले. आगीचा पेटता बोळा लखन बोरसेच्या अंगावर फेकला. दीपक व बबली गुप्ता यांच्याही अंगावर पेट्रोल उडाल्याने तसेच लखनची आग विझवताना दोघेही भाजले. गंभीर जखमी प्रशांत बोरसेवर मुंबईत उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...