आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिवांना दिल्या सूचना:ज्या जिल्ह्यात नाट्यगृहे नाहीत तिथे उभारणार : सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ज्या जिल्ह्यात नाट्यगृहे नाहीत त्या जिल्ह्यात नाट्यगृहे उभारण्याची योजना तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक खात्याचे सचिव सौरभ विजय यांना दिल्या. सह्याद्री अतिथीगृहात सांस्कृतिक खात्याच्या अाढावा बैठकीत ते बाेलत हाेते. महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग देशातील सर्व राज्यांच्या सांस्कृतिक विभागात अव्वल व्हावा, त्यासाठी विभागाचे काम अधिक उत्तम होण्यासाठी त्यांनी अनेक सूचना केल्या. यावेळी सांस्कृतिक उपसचिव विद्या वाघमारे, अवर सचिव सु. दि. पाष्टे, अवर सचिव बाळासाहेब सावंत, संचालक बिभिषण चौरे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे संचालक विवेक भिमनवार, कोल्हापूर चित्र नगरीचे संचालक संजय पाटील, पुराभिलेख संचालक सुजित उगले, पु.ल.देशपांडे कला अकादमीचे संचालक संतोष रोकडे, राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ.तेजस गर्गे, दार्शनिका विभागाचे मुख्य संपादक व सचिव दिलीप बलसेकर, हिंदी गुजराती व सिंधी साहित्य अकादमीचे सहसंचालक शसचिन निंबाळकर, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे सचिव संतोष खामकर यांच्यासह अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके सांस्कृतिक विभागाने सत्कार करताना पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके द्यावीत. प्रत्येक कार्यालयात जनतेसाठी एक सूचनापेटी असावी. आवश्यक पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. खात्यांतर्गत नस्ती निपटारा कायद्याची अंमलबजावणी तातडीने करावी. छोट्या छोट्या खर्चांचे अधिकार विकेंद्रित करावेत, वृद्ध कलाकारांचे थकित अनुदानांचे तातडीने वितरण करावे. राज्यभरातील विविध कला क्षेत्रातील कलाकार व कलातंत्रज्ञांची सूची तातडीने अद्यावत करावी. प्रत्येक कामाला कालमर्यादा आखून घेतली पाहिजे असेही आदेश त्यांनी दिले. राज्यातील सांस्कृतिक खात्याच्या ताब्यातील मंदिरे व गड किल्ले यांच्या देखभालीचा तातडीने आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

दर तीन महिन्यांनी मंत्र्यांना अहवाल सादर करावा सांस्कृतिक खात्यांच्या विविध अडचणीही त्यांनी यावेळी समजून घेतल्या. त्या अडचणी सोडविण्यासाठीही त्यांनी बैठकीतच सूचना केल्या. खात्यांतर्गत विविध महामंडळे, समित्या व विभाग यांच्या बैठका नियमित व्हाव्यात, दर तीन महिन्यांनी अधिकारी बैठक घेऊन मंत्र्यांना विभागाचा कार्य अहवाल सादर करावा, पुढील आर्थिक वर्षभराच्या कामांचे नियोजन जानेवारीतच तयार ठेवावे, असे त्यांनी सांगितले. ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातील राज्यातील सर्व हुतात्म्यांची माहिती विविध माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

बातम्या आणखी आहेत...