आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात घरफोडीचे सत्र:विविध भागात 3 घरफोड्या, चोरांनी लांबवला 6 लाखांचा ऐवज

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून गुरुवारी तीन शहरातील गंगापूर, आडगाव, म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 3 घरफोडीच्या गुन्ह्यात 6 लाखांचा ऐवज चोरी करण्यात आला. चोरांना बंद घरांना लक्ष करत घरफोडी केल्याचा पोलिसांच्या तपासात पुढे आले.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि संध्या ठाकुर (रा. चौंडेश्वरीनगर, आडगाव शिवार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यांचे पद्मावती रो हऊस आहे. घर बंद असतांना दरवाजाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरुममध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने असा 3 लाख 29 हजारांचा मुद्देमाल चोरी करुन नेला. ठाकुर घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आले.

दुसऱ्या घटनेत मनोज काकड रा. शंकुतला निवास जुना चांदशी रोड यांचे मखमलाबाद गाव मातोरी रोड येथे ओम हार्डवेअर नावाचे दुकान आहे. या दुकानाचा पाठीमागील लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून लाॅकचे नट उघडून दुकानात प्रवेश केला. दुकानात ठेवलेले कॅमेरा व्हीक व्हीजन चायनलचा डिव्हीआर, कॅमेरा, टीबी हार्ड डिस्क, पितळी मटेरीअल, असा 45 हजारांच्या वस्तू चोरी केल्या.

अमोद वैशंपायन (रा. प्रणव बंगला, संभाजी चौक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुटुंबियासोबत बाहेर गेलेले असतांना बंगल्याच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे सिक्के असा 2 लाख 35 हजारांचा मुद्देमाल चोरी केला.याप्रकरणी अनुक्रमे आडगाव, म्हसरुळ, आणि गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद घरे लक्ष

घरफोडी करणाऱ्यांकडून परिसरात रेकी करुन बंद घरांना लक्ष केले जात आहे. बंद घराच्या खिडकीचे गज कापून अथवा दरवाजाचे कुलुप तोडून घरफोडी केली जात आहे. पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र घरफोडीचे गुन्हे उघडकीस येत नसल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...