आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:माेबाइलवर बाेलत असताना बंद पडलेल्या दुचाकीची चोरी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी बंद पडल्याने ती रस्त्याच्या कडेला उभी करत दुचाकीचालक फोनवर बोलत पुढे गेला असता उभी केलेली दुचाकी चाेरांनी लांबवली. अंबड परिसरातील एका हाॅटेलसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि भालचंद्र संत (रा. उंटवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुचाकी (एमएच १५ एफई १००९) ने जात असतांना दुचाकी बंद पडली. बंद दुचाकी ढकलत एका हाॅटेलसमोर पार्क केली. दुचाकीची चावी काढण्यास ते विसरले. मोबाइलवर बोलत बोलत ते थोडे पुढे आल्यानंतर पुन्हा परतले असता जागेवर दुचाकी दिसून आली नाही. चोराने दुचाकी चोरी केल्याचे समजले.

बातम्या आणखी आहेत...