आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जॉगिंग ट्रॅकवर बसवण्यात आलेल्या स्प्रिंकलर्सला लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था नसताना नव्याचे नऊ दिवसांप्रमाणे फोटो काढण्यापुरता स्प्रिंकल सुरू होते. मात्र, नंतर चोरीला गेले असून त्याच्या चौकशीची मागणी आता जॉगर्सकडून केली जात आहे. स्प्रिंकल चोरून नेले पण बसवलेले स्प्रिंकल कसे काढायचे हे ज्याला माहिती आहे त्यानेच चोरले याचा तपास करावा. असाच प्रकार डीजीपीनगर जॉगिंग ट्रॅकवर स्प्रिंकलर्स बसवताना संबंधितांनी बजेट तयार करताना तिथे पाण्याची व्यवस्था आहे की नाही हे तपासलं नव्हतं का? इंदिरानगर ट्रॅक येथे पाणी नसतानादेखील स्प्रिंकलर्स लावण्यात आले.
सुरुवातीला जॉगिंग ट्रॅकपासून रस्ता ओलाडून १०० मीटर दुरून पाणी मिळण्याची विनंती केली. मिळणाऱ्या पाण्याच्या बदली सदर विहीरमालकाला सांगितले की, तुम्ही आम्हाला पाणी द्या आम्ही तुम्हाला विहिरीवरती आरसीसी बांधकाम करून देऊ. यातत्त्वावर पाणी दिले. परंतु आठ-नऊ महिने उलटूनही जेव्हा विहिरीवरती स्लॅब टाकण्यात आला नाही तेव्हा विहीर मालकाने त्या विहिरीतील पाणी देणे बंद केले. यासाठी त्वरित जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत स्प्रिंकलर चोरीची चौकशी करावी, अशी मागणी जॉगर्संनी केली आहे.
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवरील स्प्रिंकल गेले चोरी. टँकरने पाणीपुरवठा कशासाठी सध्या जॉगिंग ट्रॅकवर जॉगर्सची गर्दी होत आहे. स्प्रिंकलर असताना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकला टँकरने पाणी द्यायची काय गरज आहे, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे. - संतोष गोवर्धने, जॉगर्स बिल काढण्यासाठीच हे प्रकार ट्रॅकवर जे ओरिजनल स्प्रिंकलर्स असतात त्या ठिकाणी चायनीज स्प्रिंकलर वापरून बिल काढले जाते. काही दिवसांनी मुद्दाम चोरून नेतात. जेणेकरून लोकप्रतिनिधींनी चौकशी केली तर सांगतात की आम्ही ओरिजनल स्प्रिंकलर्स लावले. असाच प्रकार सर्रास होत आहे. डीजीपीनगर जॉगिंग ट्रॅक इथेही स्प्रिंकलर चोरीला गेले आहेत. - जय कोतवाल, स्थानिक इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवरील स्प्रिंकल गेले चोरी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.