आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या गंभीर:विभागात 11683 बेरोजगारांची नाेंद, नोकरी मात्र फक्त 3057 तरुणांनाच

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौशल्य विकास आणि रोजगार विभागाच्या वतीने राज्यभरात रोजगार मेळाव्यांद्वारे बेरोजगारांच्या हाताला काम दिले जात असून, एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान नाशिक विभागामध्ये तब्बल ३३ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ११ हजार ६८३ बेरोजगारांची नोंदणी झाली आहे. परंतु हाती काम अवघ्या ३ हजार ५७ उमेदवारांनाच मिळाले आहे. विशेष म्हणजे या आकड्यांमध्ये पुणे विभागात सर्वात पुढे १२ हजार ६२२ बेरोजगारांना नोकरी मिळाली आहे. नागपूर विभाग तळाला असून अवघ्या ३१ जणांच्या हाताला काम देण्यात कौशल्य विकासला यश आले आहे.

राज्य सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या नियमित रोजगार मेळावे आयोजित केले जात आहे. त्यासाठी ‘महास्वयंम’ पोर्टलवर रोजगारासाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये उमदेवारांना रिक्त जागांचा तपशील उपलब्ध करून दिल्यानंतर लागलीच नोकरीसाठी अर्ज करण्याचीही संधी दिली जात आहे. या उपक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक विभाग हा चौथ्या स्थानी आहे.

प्रथम क्रमांकावर पुणे विभाग असून त्याखालोखाल नंतर मुंबईमध्ये तरुणांना नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभाग मिळून ४ हजार १३२ बेरोजगारांपैकी फक्त ३४७ उमेदवारांना नोकरी मिळाली. यात पूर्व नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतून विदर्भातील फक्त ३१ जणांचा समावेश आहे.दरम्यान ज्या विभागात, भागात उद्योग अधिक आहेत, त्या भागात रोजगाराच्या संधी अधिक असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रोजगार देण्याचे राज्यातील विभागनिहाय प्रमाण हे ‌भिन्न असल्याचेही यातून दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...