आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकशाही टिकवायची असेल तर बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गोल्फ क्लब ईदगाह मैदान येथे नाशिक जिल्हा धम्म मेळाव्यात ते बाेलत हाेते. मेळाव्यास राष्ट्रीय सल्लागार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.
भीमराव आंबेडकर पुढे म्हणाले की, हिंदू धर्मात अन्याय होत असल्याने या धर्मातून बाहेर पडणे गरजेचे आहे. २००६ साली किसन चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली ५२ पगडजातींनी बाैद्ध धर्मात प्रवेश केला. याबाबत चव्हाण यांनी सांगितले की, बौद्ध धर्माने मला शिक्षित केले. यामुळे मी प्राध्यपक झालो. सलिमा पाटील, दिशा शेख यांनी बौद्ध धर्मात विकास असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच शनिमा पाटील, दिशा पिंकी शेख, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे आदी उपस्थित होते. त्यांनीही मनाेगत व्यक्त केले. आयोजन अध्यक्ष प्रवीण बागूल यांनी केले. सरचिटणीस राजन जगताप यांनी सूत्रसंचालन केले. महानगरप्रमुख अविनाश शिंदे, जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी आयोजन केले होते. या मेळाव्यास नाशिकसह धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यातील धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०२५ पर्यंत काेट्यवधी लाेक बाैद्ध धर्म स्वीकारतील : अनेक राज्यात धार्मिक बंधने आली आहेत. देश संविधानाच्या विराेधात जात आहे. संविधानाची पायमल्ली हाेत असून गतिमान पद्धतीने परिवर्तनाची गरज असल्याचे भीमराव आंबेडकर यांनी सांगितले. मी देशभरात विविध राज्यांमध्ये फिरत असून २०२५ पर्यंत काेट्यवधी लाेक बाैद्ध धर्म स्वीकारतील, असेही ते यावेळी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.