आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:गावात नेटवर्कच नाही, शिक्षक म्हणतात ऑनलाइन अभ्यासकरा; रेंजसाठी जीव मुठीत धरून मुले 1 किमी दूर डोंगरावर

इगतपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंटरनेट कनेक्टिव्हिटीअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच
Advertisement
Advertisement

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शहरी भागात नेटवर्क असल्यामुळे विद्यार्थी अँड्राॅइड मोबाइल, लॅपटाॅपवर अभ्यास करत असल्याचे चित्र आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही बऱ्याच गावांत माेबाइल नेटवर्क अभावी इंटरनेटपासून वंचित राहावे लागत आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावात मोबाइलला नेटवर्क मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एक किलोमीटर डोंगरावर जाऊन आॅनलाइन अभ्यास पूर्ण करावा लागत आहे.

गावात कोणत्याच कंपनीला चांगले नेटवर्क मिळत नाही. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लहान मुलांना शिक्षणासाठी एक किलोमीटर पायी डोंगरावर जावे लागत आहे. डोंगरावर जाताना ही सर्प, विंचू अशा विषारी प्राण्यांची भीती नाकारता येत नाही. तरी देखील विद्यार्थी आपला जीव मुठीत धरून हा अवघड अभ्यासक्रम करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण देताना शिक्षकांनाही कठीण जात आहे.

माेबाइल कंपनी दखल घेत नाही

आमच्या गावात काेणत्याही माेबाइल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. परिणामी कॉल करायचा असल्यास गावाशेजारील डोंगरावर जावे लागते. ग्रामपंचायतीच्या वतीने माेबाइल टाॅवरची मागणी केली हाेती. मात्र, काेणतीच मोबाइल कंपनी मागणीची दखल घेत नाही. - मंगला बोंबले, सरपंच

विद्यार्थ्यांनी डोंगराकडे जाऊ नये : माेडाळे परिसरात काेणत्याही टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क नसल्याचा अहवाल आम्ही राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र नेटवर्कसाठी विद्यार्थ्यांनी आपला जीव मुठीत धरून डोंगरावर जाऊ नये. -चंद्रभागा तुपे, मुख्याध्यापिका, जि.प. शाळा, मोडाळे

Advertisement
0