आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनशांती धाम:शिवभक्तीशिवाय जीवनाचा उद्धार नाही ; सद‌्गुरू शांतिगिरी महाराजांचे प्रतिपादन

ओझर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रम्-फलम्-पुष्पम्-तोयम् अशा अल्पशा पूजेनेदेखील भगवान शिव प्रसन्न होतात. अत्यंत दयाळू आणि भक्तवत्सल भगवान भोलेनाथ आहेत. मनुष्य जीवन सार्थकी लावायचे असेल तर शिवभक्ती करणे आवश्यक आहे.. “ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ “श्रमली” हे संत वचन आहे, असे प्रतिपादन जगद‌्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर सद‌्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.

“देवभूमी” जनशांती धामात शांतिगिरीजी महाराज आणि भाविकांच्या हस्ते मंत्रघोषात भगवान बाणेश्वरास महाजलाभिषेक पहाटे ब्रह्ममुहूर्तावर झाला. चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त कावडधारी भाविकांच्या उपस्थितीत वाजत गाजत तीर्थ मिरवणूक आश्रम परिसरात संपन्न झाली.

याप्रसंगी शांतिगिरीजी महाराज भाविकांना उपदेश करताना म्हणाले की, दुर्लभ असलेला मनुष्यदेह आपल्याला मिळाला आहे. हे आपले मोठे भाग्य आहे. कारण स्वर्गीची अमर इच्छिती मृत्युलोकी जन्म व्हावा. याचा अर्थ लक्षात घ्या. भक्तीचा आनंद केवळ मनुष्य देहातच मिळू शकतो. आपल्या बरोबरच आपल्या पितरांचाही उद्धार करण्यासाठी प्रत्यकाने शिवभक्ती करा.‘शिव-शिव अक्षरे दोन जो वदे रात्रंदिन धन्य तयाचा संसार’...या प्रमाणे भगवान शिवाच्या नामाचा जप करा. सतत पुण्यकर्म करत रहा. जपानुष्ठान करा. श्रमदान करा. लहान मुलांवर बालवयातच योग्य संस्कार करा, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. म्हणूनच जय बाबाजी भक्त परिवार यावर्षीच्या पाच लाख वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वितेनंतर यापुढेही वृक्षारोपण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचा प्रारंभ पहाटे ४ वाजता ब्रह्ममुहूर्तावर भगवान बाणेश्वराच्या अभिषेक-पूजनाने करण्यात आला. पहाटे ५ वाजता नित्यनियम विधी,ध्यान, प्राणायाम, एकनाथी भागवत वाचन महाआरती, प्रवचन, सत्संग संपन्न झाला. यावेळी भगवान बाणेश्वर महादेव व श्री बाबाजींच्या दर्शनासाठी भविकांनी मोठी गर्दी केली.

साेमवारी पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश देत जय बाबाजी भक्तपरिवारातर्फे विक्रमी वृक्षाराेपण करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात ही वृक्षाराेपण माेहीम राबविली गेली. लागवड केलेल्या झाडासाेबतचा हजाराे फाेटाे भाविकांनी पाठवले. सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान एक तासात पाच लाख वृक्ष लावण्याचा संकल्प परिवाराने केला हाेता, ‘एक कुटुंब, दाेन वृक्ष’ या संकल्पनेंतर्गत ही माेहीम राबवली गेली. प्रमुख शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...