आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकजवळ एक्सप्रेसचे डबे घसरले:जोराचा धक्का बसला आणि आम्ही बसल्या जागेवरून डब्यात खाली फेकले गेलो; आता पुढचा प्रवास रद्द, प्रवाशांनी सांगितली आपबीती

नाशिकरोड/ लहवित4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ठरलेल्या वेळेनुसार रेल्वेचा प्रवास सुरू असतानाच जोराचा झटका बसला...आणि डब्यात बसल्या बर्थवरून आम्ही खाली फेकले गेलो...अनेक क्षण काय हाेते आहेे हे कळलेच नाही... थाेड्याच वेळात आम्ही प्रवास करत असलेली रेल्वे रुळावरून घसरून माेठा अपघात झाला असल्याचे लक्षात आणि अपघातापाठाेपाठ आम्हाला दुसरा धक्का बसला... ’ मुलीचा २१ एप्रिला विवाह असल्यामुळे तयारीसाठी मुंबईहून बिहारमधील मधुबनी येथे जात असलेले उदयकांत मंडल हे ‘दिव्य मराठी’ ला आपबीती सांगत हाेते. ते मुंबईत विकासक म्हणून व्यवसाय करतात. ते म्हणाले, वातानुकूलित डब्यांनाही या अपघाताचा फटका बसल्यानंतर सर्व प्रवाशांप्रमाणेच आम्हीही रेल्वेतून बाहेर पडलो. या घटनेनंतर पुढच्या प्रवासासाठी नाशिकरोडहून प्रशासनाने विशेष गाडीची व्यवस्था केली असली तरीही आम्ही मात्र प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व कुटुंबीयांसह आता मुंबईला परतणार आहाेत. त्यानंतर पुढील प्रवासाचे नियाेजन केले जाईल. या घटनेनंतर नाशिकरोडपर्यंत पोहाेचण्यासाठी बस आणि स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली. मात्र आम्ही टीसीकडून मिळणाऱ्या सूचनांची वाट पाहात आहाेत, असेही मंडल यांनी सांगितले.

कडाक्याचे ऊन पाहून ग्रामस्थांनी प्रवाशांना पुरवले माेफत पाणी, खाद्यपदार्थ
नाशिक- भरदुपारी म्हणजे सव्वातीनच्या सुमारास अपघात झाल्याने प्रवाशांकडील सामानही अस्ताव्यस्त झाले. वृद्ध, महिला, मुले यांची संख्या पाहूनच लहवीत गावातील तरुणांनी ट्रॅक्टर आणि मिळेल त्या वाहनांमधून पाण्यांच्या बाटल्यांचे बाॅक्स आणि खाद्यपदार्थ घेऊन घटनास्थळी धाव घेतली. उन्हाचा कहर जाणवत असल्यामुळे अनेकांनी तर प्रवाशांना पिण्यासाठी माेफत पाणी पुरवले. बस, ट्रॅक्टर, अॅम्ब्युलन्स, खासगी प्रवासी टॅक्सी, इतर खासगी वाहने यातून रेल्वेतील प्रवाशांनी नाशिकरोड स्थानक गाठण्यास प्राधान्य दिले.

सिटी लिंकच्या बसद्वारे माेफत वाहतूक
घटनेची माहिती मिळताच नाशिक महानगरपालिकाद्वारा संचालित सिटी लिंकच्या ५० बस तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. त्यातील पहिल्या १० बसमधूनच प्रत्येकी ७५ ते १०० याप्रमाणे प्रवासी नाशिकरोडला साेडण्यात आल्याची माहिती सिटी लिंकचे आॅपरेशन विभागातील अधिकारी अनिल वाघ यांनी दिली. गरजेनुसार आणखी ४० बस तेथे सज्ज ठेवण्यात आल्याचेदेखील त्यांनी सांगितले

हमालांकडूनही माेफत सेवा
नाशिकरोड, देवळाली कॅम्प आणि लहवीत स्थानकातील हमालांनीही या प्रसंगात माणुसकीचे दर्शन घडवले. इतर वेळी मागू त्या माेबदल्यावर ठाम असलेल्या आणि ताेपर्यंत सामान उचलण्यास नकार देणाऱ्या या हमालांनी अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना सामान काढण्यास, उचलण्यास आणि पर्यायी वाहतूक व्यवस्थेपर्यंत अगदी विनाशुल्क मदत करून माणुसकीचा झरा अजूनही जिवंत असल्याचेच दाखवून दिले.

बातम्या आणखी आहेत...