आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:गावठाणात आता हाेणार 24 तास पाणीपुरवठा ; स्मार्ट सिटी कंपनीच्या स्काडा प्रणालीचा अवलंब

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन आणि गावठाणात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्र पुनर्विकास आणि स्काडा प्रणालीचा अवलंब केला जात आहे. यासाठी जलकुंभांचे सर्वेक्षण झाले असून येत्या आठवड्यात आयआयटीमार्फत तपासणी केल्यानंतर कामाचे कार्यारंभ आदेश विकसकास दिले जाणार आहे.

या योजनेच्या पहिला टप्प्यात पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राच्या पुनर्विकासासाठी मृदा चाचणी व नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आरेखन झाले आहे. याच्या पर्यवेक्षण नियंत्रण आणि डेटा संपादन अर्थात स्काडा प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी मनपाच्या ११० जलकुंभांचे सर्वेक्षण झाले आहेत. आरेखनास तत्त्वत: मंजुरी दिल्यानंतर कंत्राटदारासोबत बैठक होऊन कामाचे नियोजन हाेणार आहे.

६० ठिकाणांचे सर्वेक्षण स्काडा प्रणालीचा भाग असलेल्या व्यावसायिक वॉटर मीटरबाबत पहिल्या टप्प्यात ६० ठिकाणांचे सर्वेक्षण झाले आहे. याची बैठक दाेन दिवसांत मनपाच्या संबंधित विभागासोबत घेण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर २ ठिकाणी मीटर बसविण्याचे काम आठवडाभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

बातम्या आणखी आहेत...