आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट स्कूल:महापालिकेच्या 89 शाळांमध्ये होणार 700 डिजिटल क्लासरूम ; दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेचा टॉप गिअर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोरगरिबांसाठी वरदान ठरणाऱ्या महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आता आयुक्त रमेश पवार यांनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ८९ शाळांमध्ये जवळपास ७०० क्लासरुम डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात टॅब किंवा लॅपटॉप मिळण्याची आशा निर्माण झाली असून डिजिटल शिक्षण देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महापालिका शाळांमध्ये अत्यंत कमी दरामध्ये शिक्षण मिळते. गोरगरीब विद्यार्थ्याची मुले शालेय प्रवाहापासून वंचित राहू नये यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने ८९ प्राथमिक व तेरा माध्यमिक अशा एकूण १०२ शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी महापालिका शाळांचा दर्जा वादात आहे. ही बाब लक्षात घेत तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी स्मार्ट स्कूल ही संकल्पना सुरू केली. त्यासाठी महापालिकेच्या सहा शाळांऐवजी सर्वच शाळा स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आयुक्त पवार यांनी सहा शाळांऐवजी सर्वच शाळांचा दर्जा सुधारण्याचा निर्णय घेतला.

स्मार्ट स्कूल झाल्यास असा मिळणार फायदा... स्मार्ट स्कूलमध्ये विविध तंत्रांचा वापर करून मुलांना उत्तम दर्जाचे आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे, शिक्षकांना स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून परस्पर संवादी तंत्रे, मल्टिमीडिया सामग्री वापरण्याचे प्रशिक्षण देऊन सक्षम केले जाणार आहे. शाळांमध्ये इ-बुक्स, प्रोजेक्टर,डिजिटल बोर्ड अशा सुविधा असणार आहेत. यासाठी महापालिकेत इ-लर्निंग सेंटर उभे केले जाईल. स्मार्ट सिटी कंपनीला यासाठीचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...