आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांसाेबत मार्गाची पाहणी:वडाळा-पाथर्डी मार्गावरील अवजड वाहनांवर लवकरच निघणार तोडगा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे महामार्गाने द्वारकाकडे येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने वळविण्यात आल्याने या रस्त्यावर अपघात वाढले आहे. यामुळे वडाळा ते पाथर्डी मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे वृत्त ‘डी. बी. स्टार’ने शुक्रवारी (दि.१६) प्रसिद्ध केले हाेते. या वृत्ताची राजकीय व प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली असून वडाळा-पार्थडी मार्गावरील अवजड वाहनांवर लवकरच तोडगा निघणार आहे. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी या मार्गाची पाहणी केली.

दिव्य मराठीतील वृत्तानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी दखल घेत भाजपाच्या शिष्टमंडळासाेबत रस्त्यावरील अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याची मागणी पाेलिस आयुक्तांकडे केली होती. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश धुमाळ, पोलिस निरीक्षक पराग जाधव यांनी वडाळा-पाथर्डी मार्गावरील वाहतुकीचा आढावा घेतला. वाहतूक अन्य योग्य मार्गाने वळवू अथवा रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवू असे आश्वासन यावेळी पौर्णिमा चौगुले यांनी दिले. यावेळी माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, सतीश सोनवणे,श्याम बडोदे, शाहीन मिर्झा, अजिंक्य साने, सचिन कुलकर्णी, यशवंत निकोळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...