आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पष्टीकरण‎:नाशकातच ‘महिन्द्रा’ची‎ वाढीव गुंतवणूक हाेणार‎

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा महिंद्रा‎ इलेक्ट्रिकलचा प्रोजेक्ट नाशिक येथून पुणे येथे हलवला‎ जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार देवयानी‎ फरांदे यांनी गुरुवारी (दि. ९) उद्याेगमंत्र्यांनी प्रश्न विचारला.‎ त्यावर उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकचा काेणताही‎ प्रकल्प पुण्यात येत नसून महिंद्रा कंपनी नाशिकमध्येही‎ गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट केले.‎

नाशिक येथे येणारा महिंद्रा इलेक्ट्रिकलचा प्रोजेक्ट पुणे‎ येथे शिफ्ट होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर‎ विधानसभेत फरांदे यांनी, नाशिक येथील विविध‎ वृत्तपत्रातून उद्योगमंत्री यांच्या आदेशाने नाशिक महिंद्रा‎ इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट पुणे येथे शिफ्ट होत असल्याचे प्रसिद्ध‎ झाले आहे. राज्याच्या माजी मंत्र्यांनी देखील याला दुसरा‎ दिलेला आहे. यावर उद्याेगमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी‎ मागणी केली. त्यावर सामंत म्हणाले की, नाशिक येथील‎ महिंद्रा प्रोजेक्ट शिफ्ट करण्याबाबत प्रसिद्ध वृत्त निराधार व‎ चुकीचे आहे. महिंद्रा कंपनी पुणे येथे गुंतवणूक करीत आहे.‎ त्याचप्रमाणे नाशिक येथे देखील गुंतवणूक करणारच आहे.‎ त्यामुळे नाशिक येथील कोणताही प्रकल्प अन्यत्र जाणार‎ नसून शहरात महिंद्रा कंपनी नव्याने गुंतवणूक करणार‎ असल्याचे स्पष्ट झालेले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...