आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा बंद:नाशिकरोडला 4 प्रभागांमध्ये उद्या पाणी नाही

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड विभागातील गोदावरी जलकुंभ भरणाऱ्या पंपाच्या मुख्य ऊर्ध्ववाहिनीच्या पाइपलाइनची गळती दुरुस्ती करण्याचे काम करण्यासाठी गुरुवारी (दि. ३) प्रभाग क्र. १७, १८, १९ व २० या चार प्रभागांमध्ये सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सोबतच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठादेखील कमी दाबाने होणार आहे.गोदावरी जलकुंभ भरणाऱ्या जलवाहिनीला मंगळवारी मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली असून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

मात्र गुरुवारी कामासाठी जास्त वेळ लागणार असल्यामुळे चार प्रभागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी त्याची दखल घेऊन आवश्यक पाणीसाठा करून गैरसोय टाळावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागांनी केले आहे.

या विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद : प्रभाग क्र. १७ : कॅनाॅलरोड परिसर, नारायणबापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर, एमएसईबी कॉलनी, तिरुपतीनगर, टाकळीरोड परिसर, भीमनगर परिसर.
प्रभाग क्र. १८ : शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गाव, सायखेडारोड, भगवा चौक, शिवशक्तीनगर.
प्रभाग क्र. १९ : गोरेवाडी
प्रभाग क्र. २० : पुणेरोड परिसर, रामनगर, विजयनगर, शाहुनगर, लोकमान्यनगर, मोटवाणी रोड, कलानगर, आशानगर, जिजामातानगर.

बातम्या आणखी आहेत...