आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • These Are Measures To Prevent Cheating Of Grape Farmers; Traders Should Conduct Transactions On The Basis Of Documentary Evidence; Instructions Of Inspector General Of Police

द्राक्ष शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी 'या' आहेत उपाययोजना:व्यापाऱ्यांची कागदपत्रे चेक करत व्यवहार करा; पोलिस महानिरिक्षकांच्या सूचना

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण आपल्या परीवारात मुलामुलीचे लग्न जुळवतांना आपण सर्व प्रकारच्या चौकशा बारकाईने करत असतो त्याच धर्तीवर आपण आपल्या द्राक्षमालाची विक्री करतांना व्यापार्याची ऎपत व कागदोपत्री पुरावे तयार करुनच व्यवहार केला पाहिजे. त्यासाठी गावागावात ग्रामसभेतून जनजागृती करुन शेतकर्यांनी सजग रहायला हवे व्यापार्याने दिलेला चेक पँनकार्ड याची संबंधित बँकेत जाऊन पडताळणी केल्यास फसवणुकीला आळा बसेल सावधगिरी बाळगली जाईल, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी.जी. शेखर यांनी ओझर येथे केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने ओझर येथील सभागृहात आयोजित शेतकरी वर्गाची व्यापार्यांकडुन होणारी फसवणुक या विषयवर संवाद मेळाव्यात ते बोलत होते पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे ,ओझरचे पोलिस निरिक्षक दुर्गेश तिवारी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसलेविभागाचे अध्यक्ष अँड रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथमत: द्राक्ष उत्पादकांची विविध मार्गाने होणारी फसवणुक ही विश्वास संपादन करुन कशी होते ,शेतकर्यांना व्यापारी वर्ग बाजारभावात तडजोड करायला भाग पाडतो, चेक देऊन पलायन करतो ,दिलेले आधार कार्ड हे बनावट असते यासारख्या मुद्यांवर उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी प्रस्ताविकातुन विषय मांडले याप्रसंगी द्राकदष बागायतदारांची व्यापारी वर्गाकडुन होत असलेली फसवणुक तसेच गेल्या चार पाच वर्षापासुन विविध भागतील व्यापार्यांनी केलेली लुट शेतकरी सतत पोलिस स्टेशन व कोर्टात उभ परप्रांतीय व्यापार्यांची पडताळणी करणेबाबत त्याचबरोबर व्यवहारात रोखठोकपणा बाळगला पाहिजे.व्यापार्याची पत तपासली पाहिजे केवळ वाढिव भाव देऊ करणार्या व्यापार्याचे मनसुभे लक्षात आले पाहिजे य

पोलिस अधिक्षक कार्यालयात किसान सेलचे कामकाज सुरु करुन शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास कटिबध्द राहणार आहे त्यासाठी पोलिस पाटलांना यापुर्वीच सुचना दिल्या असल विभागीय संचालक अँड रामनाथ शिंदे यांनी चेक न वटल्यावर करावायाच्या कायदेशीर कारवाईची माहिती दिली संचालक बबनराव भालेराव, सुनिल बार्हाते , नंदु पडोळ, बबलु मोरे, कैलास पाटील, दिनेश रकिबे , विलास गडाख, सोमनाथ माळोदे , विलास बोरस्ते , योगेश गडाख ,शिवलाल ढोमसे , सागर कुशारे, अनिल‌ क्षीरसागर, माधव क्षीरसगार,

विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. शेखर यांच्या सुचना

  • द्राक्षमालाचे व्यवहार सौदा पावतीनेच करा पोलिस कारवाईसाठी ते आवश्यकच
  • व्यापारासाठी आलेल्या व्यापार्यांचे छायाचित्रासह हंगामी व कायम निवासी पुरावा संबंधित पोलिस ठाण्यात ठेवण्याच्या सुचना
  • व्यापार्यासोबत काम करणारे पायलटची आधार कार्डसह नोंद रजिस्टर ठेवणार
बातम्या आणखी आहेत...