आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये घरफोडी:चोरांनी तिजोरीसह दीड लाखांचे दागिने केले लंपास! इंदिरा नगर परिसरात वाढल्या चोऱ्या

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लॅटच्या दरवाजाचे कडी-कुलूप तोडून घरात प्रवेश करत चोरांनी लाकडी कपाटातील लोखंडी तिजोरीसह दीड लाखांचे दागिने लंपास केले. रविवार (ता. 5) सकाळी राधे सेसीडेन्सी भगवती चौक राजीवनगर येथे हा प्रकार उघडकीस आला. इंदिरानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि देवेंद्र क्षिरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 31 मे ते 4 जून या कालावधीत ते बाहेरगावी गेले होते. चोरांनी फ्लॅटचे सेफ्टी दरवाजाचे सुरक्षायंत्रणा आणि कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरुमच्या दरवाजाचेही कुलूप तोडून प्रवेश केला.

आत असलेल्या लाकडी कपाटातील लोखंडी तिजोरी आणि त्यातील सोन्याचे दागिने, देवाच्या मुर्ती, सोन्याचे बिस्कीटे, चांदीच्या मुर्ती, असा दीड लाखाचे सोने चांदी चे दागिने आणि तिजोरीत ठेवलेले पत्नीच्या आणि सासूच्या नावाच्या फिक्स डिपाॅजिटचे प्रमाणपत्र, आदी महत्वाचे कागदपत्र चोरी करण्यात आले. क्षिरसागर कुटुंब घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे समजले. वरिष्ठ निरिक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

तिजोरीच नेली चोरून

तिजोरी लोखंडी असल्याने चोरांना उघडण्याचा प्रयत्न केला असावा मात्र. तिजोरी उघडत नसल्याने चोरट्यांनी तिजोरीच चोरी केली. या घटनेचे परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...